

Mahatma Gandhi Letters to Mirabehn
esakal
महादेव कांबळे - sakal.avtaran@gmail.com
महात्मा गांधींच्या सार्वजनिक जीवनावर आणि विचारांवर विपुल लेखन झाले आहे; मात्र मीराबेनला लिहिलेल्या पत्रांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक वेगळाच पैलू उलगडतो. ‘चिरंजीव मीरास’ हा पत्रसंग्रह महात्म्याच्या अंतरंगात डोकावताना, त्यांच्यातील प्रेमळ, काळजीवाहू पित्याचीही ओळख करून देतो.
बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे व्यक्तिमत्त्व ज्यांच्या आयुष्यात आले त्यांनी आपल्या परीने या महात्म्याचे विविध पैलू उलगडले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, सामाजिक विचार आणि राजकीय भूमिका यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र, साधना प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि अनिल कारखानीस यांनी अनुवादित केलेल्या ‘चिरंजीव मीरास’ या पुस्तकातून महात्मा गांधी यांच्यातील बाप नावाचे विस्तारलेले छत्र समोर येते. मूळ इंग्रजी पुस्तक ‘बापूज लेटर्स टू मीरा’ हे ऑगस्ट १९४९ मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे विविध भाषांत अनुवाद झाले असले, तरी त्याचा मराठी अनुवाद प्रथमच वाचकांसमोर आला आहे.
१९८२ मध्ये जन्मलेली मॅडेलिन स्लेड ही ब्रिटिश ॲडमिरलची मुलगी वयाच्या पंधराव्या वर्षी बिथोव्हन संगीताच्या प्रेमात पडली. नंतर ती फ्रान्समध्ये गेली. तिथे ती रोमा रोलाँ या तत्त्वज्ञाच्या संपर्कात आली. त्यांनी लिहिलेले महात्मा गांधी यांचे चरित्र वाचून ती प्रभावित झाली आणि वयाच्या ३३व्या वर्षी म्हणजे १९२५मध्ये तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर येथील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात तिचे ब्रिटिशमय असलेले व्यक्तिमत्त्व गळून पडले. ती शेवटपर्यंत भारतीय म्हणून वाढली.