
महेश कोठारे
editor@esakal.com
सतत नवीन काहीतरी करायचं हा महेश कोठारे यांचा बाणाच. त्यामुळे ‘झपाटलेला’ चित्रपटाचा दुसरा भाग करताना हा भाग त्यांनी थ्रीडी तंत्रज्ञानाने बनवण्याचा निर्णय घेतला. वेगळं तंत्रज्ञान आणि बजेटही मोठे, त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या. कसा होता हा सगळा प्रवास, महेश कोठारे स्वतःच सांगत आहेत हा थरारक अनुभव...
माझ्या मनात अनेक दिवसांपासून एक तीव्र इच्छा होती, की ‘झपाटलेला’ या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग काढावा. या विचाराने मी त्याची पटकथाच लिहायला घेतली. ‘झपाटलेला’च्या पहिल्या भागात माझ्या बरोबर लेखक म्हणून काम करणारा माझा मित्र अशोक पाटोळे याच्यासोबत मी पुन्हा संपर्क साधला. त्याने पूर्वी ‘झपाटलेला’ साठी अतिशय प्रभावी काम केलं होतं. जेव्हा मी त्याला दुसऱ्या भागाची कथा ऐकवली, तेव्हा त्याला ती कल्पना फारच आवडली. त्याने पटकथेला चांगल्या प्रकारे रूप दिलं. त्यामध्ये आवश्यक असलेली बांधणी केली आणि स्क्रिप्ट तयार झाली.