

MLA Maithili Thakur
esakal
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप व नितीशकुमार यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. देशाच्या राजकीय पटलावर बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात मिळालेल्या विजयाची चर्चा सुरू आहे. त्याबरोबर या विजयात महत्त्वाचे योगदान दिलेल्या घटकांच्या योगदानाची चर्चाही होत आहे. मैथिली ठाकूर ही बिहारच्या निवडणुकीतील तरूणाईचा मोठा आयकॉन ठरली. उमेदवार निवडीत वैविध्य राखलेल्या भाजपने मैथिलीची निवड करून देशभरातील व बिहारमधील तरूणाईचे लक्ष आपल्या पक्षाकडे वेधून घेतले होते.