
पाकिस्तानविरुद्धच्या सैन्यात एक सच्चा भारतीय
सैनिक स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मार्गातले भूसुरुंग निकामी करत अहोरात्र पुढे जात होता. ७२ तास उलटून गेले, तरीही तो अथकपणे काम करत होता. गोळीबार, तोफगोळ्यांचा मारा ह्या कशाचीही त्याला तमा नव्हती... अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, त्या प्रमाणे त्याला फक्त आपल्या रणगाड्यांना पुढे नेणारा रस्ता दिसत होता! हा लढवय्या म्हणजेच मेजर राम राघोबा राणे!
बॉम्बे इंजिनिअर ग्रुुपमध्ये आम्ही अधिकारी नुकतेच कमिशन (नियुक्त) झालो होतो. एके दिवशी पुण्यात आमच्या (BEG सेंटर) केंद्रातल्या सभागृहात बसलो होतो. आमच्याच एकेका परमप्रतापी अशा अधिकाऱ्यांच्या, सैनिकांच्या गोष्टी समोर पडद्यावर बघून ऊर अभिमानाने भरून येत होता, प्रसंगी मुठीही आवळत होत्या, तेवढ्यात एका झुंजार लढवय्याची गाथा ऐकली आणि आम्ही जागच्या जागी खिळून राहिलो!
एक सच्चा भारतीय सैनिक स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तहान, भूक, झोप वगैरे सगळं पणाला लाऊन मार्गातले भूसुरुंग निकामी करत अहोरात्र पुढे जात होता. ७२ तास उलटून गेले, तरीही तो अथकपणे काम करत होता. पाकिस्तानी सैन्याकडून होणारा गोळीबार, बरसणारे तोफांचे गोळे कशाचीही त्याला तमा नव्हती.. अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, त्या प्रमाणे त्याला फक्त आपल्या पायदळाला, रणगाड्यांना पुढे नेणारा रस्ता दिसत होता! हा महान कर्मयोगी म्हणजे मेजर राम राघोबा राणे!