पुणे: बालसंगोपन ही माता आणि पिता अशी दोघांनी मिळून पार पाडण्याची जबाबदारी आहे. मूल लहान असेपर्यंत मातेवर दुधासाठी जास्त अवलंबून असल्याने आजवर केवळ मातांना बालसंगोपन रजा मिळत असे.. पित्याला देखील ती असे पण खूप थोड्या दिवसांसाठी मिळत होती.
मात्र प्रत्येक पालकाला बालसंगोपनात मदत आवश्यक असल्याचे सांगत आसाम राज्य सरकारने त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मातांसह आता एकल पित्याला (Single Fathers) म्हणजेच एकट्याने मुलांचे संगोपन करणाऱ्या घटस्फोटीत, विधुर किंवा अन्य पिता पालकाला दोन वर्षापर्यंत बालसंगोपन रजा (Child Care Leave - CCL) घेता येणार आहे.
काय आहे हा निर्णय..? कधी घेण्यात आला? राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्र सरकारी कर्मचारी यांना याबाबत वेगवेगळे नियम आहेत का? यापूर्वी काय नियम होते? कोणत्या कायद्यांतर्गत हा बदल करण्यात आला आहे? महाराष्ट्रात याबाबत काय कायदा आहे..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून...