

Make or Buy Decision and Outsourcing Strategy
esakal
प्रतीक डुंबरे - capsdumbre@gmail.com
तेनाली रामन हे मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिस्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकात एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो. ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून यावेळी ‘मेक ऑर बाय (आउटसोर्स)’ डिसिजन अर्थात रस्ता बदलण्यापूर्वी नकाशा पाहावा, या तत्त्वाचे महत्त्व जाणून घेऊ या...
मिस्टर सहजराव हे एका छोट्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे मालक होते. ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंटचा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून मात्र, एकच प्रश्न त्यांच्या डोक्यात होता. ‘एक विशिष्ट काम आपण स्वतः करायचे, की आउटसोर्स करायचे?’ आणि हाच प्रश्न घेऊन ते महाराजांच्या दरबारात आले. महाराजांना नमस्कार करून सहजरावांनी थेट प्रश्न विचारला, ‘‘महाराज, आम्ही ऑटोमोटिव्ह ब्रॅकेटवर एक मशिनिंग ऑपरेशन करतो. सध्या ते काम आमच्या फॅक्टरीतच होते. जवळच्या एका व्हेंडरने सांगितले, की तो हेच काम प्रति कॉम्पोनंट १०२ रुपयांत करून देईल.’’
महाराज म्हणाले, ‘‘मग प्रश्न काय? तुम्हाला सध्या हे काम स्वतः करताना किती खर्च येतो?’’
‘‘सुमारे ११४ रुपये.’’
महाराज लगेच म्हणाले, ‘‘म्हणजे १२ रुपये वाचताहेत!’’