हृदयनाथ मंगेशकर
kunteshreeram@gmail.com
बा बा जाऊन पाच दिवस झाले होते. तंबोरे, शिष्य, दीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई... सारे स्वर गमावून बसले होते. फक्त माझा रडण्याचा स्वर शाबूत होता.
‘‘नक्श फरीयादी हैं
किसकी शोखी-ए-तहरीर का
कागजी हैं पहरन
हर पैकरे-ए-तसवीर का’’
‘‘ईश्वरा, मी तुझं पदचिन्ह.
माझं अस्तित्व हेच एक गाऱ्हाणं आहे.
मला या निष्ठुर जगात तू का
जन्माला घातलंस ?’’
जुन्या जमान्यात आपली गाऱ्हाणी कागदावर लिहून त्याचा अंगरखा घालून लोक सरकार दरबारी तक्रारीसाठी जात, ईश्वरा ! माझी गाऱ्हाणी तुझ्यासमोर मांडण्यासाठी विश्वातल्या प्रत्येक वस्तूने कागदाचा अंगरखा परिधान केला आहे बघ!