
‘मराठा लाइट इन्फंट्री’चे कार्य आणि त्याची ब्रिटनच्या राजाने (किंग चार्लस् तिसरा) दखल घेतली आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या इन्फंट्रीचे कार्य खरोखरच गौरवशाली असून, त्याची माहिती भारतीयांना व्हायला पाहिजे.
मी महाराष्ट्रीयन असून ब्रिटनमध्ये गेल्या ५६ वर्षांपासून वास्तव्यस आहे. माझ्या दोन नातेवाइकांनी दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे लंडनस्थित ब्रिटिश लायब्ररीतील ओरिएंटल भागात जाऊन मी अभ्यास केला. तेव्हा मला समजले की मराठा ( त्यावेळी मरहठ्ठा (maharattha) असे लिहीत.) लाइट इन्फंट्रीने भारतातील व भारताबाहेरील अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. ‘मराठा लाइट इन्फंट्री’ अजूनही कार्यरत आहे. भारतातील अनेकांना या इन्फ्रट्रीचे कार्य माहीत नाही.