
प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
कार्ल मार्क्सच्या मृत्यूला १४२ वर्षं होत आली असून आजही त्याच्या तत्त्वज्ञानाने जगभरच्या श्रीमंत वर्गाच्या पोटात धडकी भरते. मार्क्ससारख्या क्रांतिकारक तत्त्वज्ञाच्या जीवनावर अलीकडेच आलेला इंग्रजी नाटकाचा मराठी अवतार दृष्ट लागावा इतका छान होता.
जागतिक पातळीवर प्राचीन इतिहासाची ‘बुद्धपूर्व जग’ आणि ‘बुद्धानंतरचं जग’ अशी विभागणी करतात. त्याचप्रमाणे आधुनिक इतिहासाची ‘मार्क्सपूर्व जग’ आणि ‘मार्क्सनंतरचं जग’ अशी विभागणी करतात. कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) या जर्मन ज्यू तत्त्ववेत्त्याच्या मृत्यूला आता १४२ वर्षं होत आलेली असून आजही त्याच्या तत्त्वज्ञानाने जगभरच्या श्रीमंत वर्गाच्या पोटात धडकी भरते. अशा क्रांतिकारक तत्त्वज्ञाच्या जीवनावर अलीकडेच ‘मार्क्स इन सोहो’ या इंग्रजी नाटकाचा मराठी अवतार बघायला मिळाला.