
सम्राट फडणीस
मराठी भाषा दोन हजारांहून अधिक जुनी असून, अन्य भाषा-संस्कृतीचे अनेक प्रभाव मराठीने पचवले आहेत.
शाळांमध्ये मराठीसाठी आग्रही राहणे महत्त्वाचे आहेच. मात्र, भाषिक अभिनिवेष राजकारणापुरताच राहू नये, तो व्यवहार्य आणि शिक्षणातही रूपांतरित व्हावा, ही त्रिभाषा सूत्रानिमित्त झालेल्या चर्चेची परिणिती ठरावी.
‘‘...भाषा एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी अनेक शतके जावी लागतात,’’
असं विधान अभिजात मराठी भाषा समितीच्या २०१३च्या अहवालात पहिल्याच प्रकरणात आहे. रंगनाथ पठारे अध्यक्ष असलेल्या या समितीचा अहवाल इंटरनेटवर संदर्भासाठी कधीही उपलब्ध आहे. मराठी भाषेचा प्रवास या प्रकरणात आहे.