
India's First Marathi Engineering College: मराठीतून इंजिनीअरिंग शिकलेली पुण्यातली पहिली बॅच नुकतीच बाहेर पडली. तीही दणदणीत मार्क्स आणि घसघशीत पॅकेज घेऊन. मराठीतून इंजिनिअरिंग शिकताना त्यांचा नेमका प्रवास कसा झाला, वाचा सकाळ प्लसच्या लेखात.
मराठी भाषेतून इंजिनीअरिंग करणार, असं जेव्हा ठरवलं तेव्हा पहिल्यांदा अनेकांनी नाकंच मुरडली. रचना म्हणाली
तिच्याच म्हणण्याला दुजोरा देत आदित्य आणि प्रथमेश सांगायला लागले की, अनेकांनी बोलून दाखवलं, मराठीत शिकून काय करणार तुम्ही, तुम्हाला मार्क नाहीत म्हणून मराठीतून इंजिनीअरिंग करताय..
पण आज याच सगळ्या पोरांना मराठीतून इंजिनीअरिंग करून घसघशीत पॅकेज मिळाली आहेत. पिंपरी चिंचवडच्या पीसीसीओई महाविद्यालयातल्या या पहिल्या मराठी इंजिनिअर्सच्या बॅचशी संवाद साधला आहे, सकाळ प्लसच्या गणेश साळुंके यांने.
मराठीतून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारी ही पहिली बॅच बाहेर पडलीय सगळे उत्तीर्ण तर आहेतच शिवाय कॅम्पसमधून त्यांना नोकऱ्याही मिळतायत. पण मराठीतून शिकले म्हणजे नेमकं काय केलं, अभ्यासक्रम इंग्रजीतच होता का, पेपर कोणत्या भाषेत लिहीले, शिक्षक बरे होते का, कोणत्या मुलांनी मोठ्या कंपन्यांत नोकऱ्या मिळवल्या...
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा सकाळ प्लसचा हा लेख नक्की वाचा.