
विष्णू सोनवणे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पहिलीपासून त्रिभाषा सक्ती व विशेषतः हिंदी सक्ती धोरणाच्या विरोधात राज्यभर निर्माण झालेल्या असंतोष पाहून राज्य सरकारने दोन्ही आदेश स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. त्यांनी नियोजित केलेल्या मोर्चाला कॉँग्रेस व शरद पवारांच्या पक्षासह सर्वपक्षीय व जनआंदोलनाचे स्वरूप आले. ही एकजूट संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देणारी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.