esakal | काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!
sakal

बोलून बातमी शोधा

काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!}

काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर जसे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते मारबतीसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशात याच शहरात हा उत्सव साजरा करण्यात येतो. पोळ्याचा पाडव्याला हा उत्सव असतो. शंभर वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव ब्रिटिश राजवटीच्या विरोधात करण्यात आला होता. ब्रिटिश जुलूम करीत असताना त्याच्या निषेध करण्यासाठी मारबत काढण्यात येत होती. स्वातंत्र्यानंतर मारबतीचा उद्देशात बदल झाला. देशाअंतर्गत प्रश्नावर ही माबरत काढण्यात येत आहे. याला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद असतो. यावर्षीही याचे आकर्षण राहणार आहे. मात्र, कोरोनाचा काळ बघता उत्सवावर शंका येते.

शंभर वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या पिवळी मारबत उत्सव पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. जागनाथ बुधवारी येथील तऱ्हाणे तेली समाज पिवळी मारबत उत्सव समितीतर्फे पिवळ्या मारबतीची तर नेहरू पुतळा, इतवारी येथून काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. विविध बडगा उत्सव समितीच्या बडग्यांचाही समावेश असतो. रोगराई, भ्रष्टाचाराला घेऊन जागे मारबत म्हणत लाखोंचा जनसमुदाय नाचत गात मिरवणुकीत सहभागी होतो. शहीद चौकात पिवळी मारबत व काळ्या मारबतीची गळा भेटीच्या वेळी उत्साहाला अगदी भरतेच आलेले असते. काळी, पिवळी मारबत, बडग्यांची मिरवणूक, त्यात सहभागी उत्साही तरुणांनी डीजे, ढोल ताशा पथक आणि बॅण्ड पथकाच्या तालावर ठेका धरतात. मध्य व पूर्व नागपुरात मिरवणुकीदरम्यान तरुणाईच्या जल्लोषाला उधाण येते. या उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागपूरकर हजेरी लावत असल्याने संपूर्ण मार्गात ''मेगा ब्लॉक''चेच स्वरूप येते.

इतरत्र कोठेही हा उत्सव साजरा होत नाही. १८९५ साली जागनाथ बुधवारी या भागातून सुरुवात झालेला मारबत उत्सव आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. समाजातील काही दृष्ट प्रवृत्तींना घालवून देण्यासाठी मारबतीचा प्रतीक म्हणून वापर केला जातो. मिरवणुकीत मारबतीसोबतच बडग्यांचाही समावेश असतो. वाईट शक्तीची धिंड काढून त्यांचे शहराबाहेर दहन करण्यात येते. शहर स्वच्छ, प्रदूषण मुक्त आणी समस्या विरहीत ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा विरोध करण्यासाठी मारबत उत्सवाचे मोठे योगदान आहे.

हेही वाचा: पंछी नदिया पवन के झोंके

मारबतीमुळे शहराला वेगळी ओळख

मारबतीमुळे नागपूर शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. लोकांचा मोठा सहभाग यात असतो. त्यामुळे दिवसेंदिवस या उत्सवाला महत्‍त्व प्राप्त झाले आहे. विविध समस्या मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो. सरकारने समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा.

- बिट्टू डोये, टिमकी

सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न

ब्रिटिश सरकार गेल्यानंतरही ही परंपरा लोकांनी कायम ठेवली आहे. सरकारला या माध्यमातून जागविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्या मारबतीच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात येतो. त्यामुळे सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात.

- अश्विनी सोनावणे, जागनाथ बुधवारी

go to top