
डॉ. सदानंद मोरे
ट्वेनचा मुद्दा फक्त रेव्हरंड विल्यम स्कॉट अमेंटपुरता मर्यादित नव्हता. त्याने जगभरच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या व ख्रिस्ती धर्मीय सरकारांच्या याबाबतच्या दुटप्पी आणि दुहेरी वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचा संबंध साम्राज्यवादाशी व विस्तारवादाशी होता. त्यामुळे त्याविषयी आणखी चर्चा करायची गरज आहे.
जगाचे भूत-भविष्य-वर्तमान घडवण्यामध्ये माणसाच्या संकल्पांचा आणि कर्माचा वाटा प्रकाशित करणे हे इतिहासकाराचे एक महत्त्वाचे कार्य आहे. याबाबत कोणाचे दुमत व्हायचे कारण नाही. अर्थात, या वाक्यात अवतीर्ण झालेला ‘माणूस’ हा शब्द तसा अगदीच अघळपघळ वाटणेही साहजिक आहे.