Primium|Marriage in Blood Relation: मामाच्या मुलीशी लग्न केल्यास होणाऱ्या मुलांच्या आरोग्याला धोका? विज्ञान काय सांगतंय.?

Hindu Marriage Act : जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे जनुकीय आजारांचा धोका किती वाढतो? सर्वोच्च न्यायालयात याचिका का दाखल झाली?
relative marriage

relative marriage

Esakal

Updated on: 

आजही महाराष्ट्रात नवऱ्या मुलला घरात येतानाच दार अडवून भावाला बहिण हे विचारते की, “तुला मुलगी झाली तर मला सून म्हणून देशील का?” मामाचा मुलगा असो किंवा आत्याची मुलगी किंवा साटंलोटं. महाराष्ट्रात या प्रथा काही नविन नाही. लहानपणापासून चिडवणं आणि मोठं झाल्यावर खरोखरच त्याच मामाच्या मुलाशी लग्न करणं ही प्रथा महाराष्ट्रात तरी फार पुर्वीपासून सुरू आहे. काही ठिकाणी तर थेट मामाशीच लग्न लावलं जातं. तर काही राज्यात मावस भावाशी लग्न करण्याची प्रथा आहे.

पण अशा विवाहांमधून जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर केंद्र सरकारला नोटीस बजावत योग्य कायदा करण्याची किंवा या विषयावर जनजागृती करण्याची शक्यता तपासण्यास सांगितले. त्यामुळे विवाहादरम्यानची जोडीदाराची निवड, सामाजिक परंपरा आणि आनुवंशिक आजारांचा धोका या सगळ्याच विषयावर देशभरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

हा विषय नेमका काय आहे, खरोखरच रक्ताच्या नात्यात लग्न केलं की अनुवंशिक आजार होतात का? याविषयी विज्ञान काय सांगतं, संशोधनातून काय समोर आलं आहे, अशा नात्यात लग्न करायचं असेल तर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. हा सगळा वाद सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं कारण काय, सरकार खरोखरच आत्ता असा काही कायदा करणार आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

Loading content, please wait...