Premium|Highlander Research Center : इतिहास ‘कर्मभूमी’ची निवड करीत असावा!

Civil Rights Movement : मार्टिन ल्युथर किंग आणि साने गुरुजी यांच्या गांधीवादी विचारांतील साधर्म्य शोधणारा हा लेख, अमेरिकेतील 'हायलँडर रिसर्च सेंटर' आणि महाराष्ट्रातील 'उसगाव डोंगरी' येथील सामाजिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करतो.
Highlander Research Center

Highlander Research Center

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

अमेरिकेमधील नागरी हक्क चळवळीशी संबंधित काही कार्यकर्ते उसगाव डोंगरी येथे येऊन गेले होते, त्यामध्ये कॅथी श्रीधर आणि मेलनी सूल या होत्या. या दोघीही अमेरिकेतील युनिटॅरियन युनिव्हर्सलिस्ट असोसिएशनशी (unitarian universalist association) संबंधित होत्या. मेलनी सूल युनिटॅरियन युनिव्हर्सलिस्ट असोसिएशनच्या चर्चमध्ये पौरोहित्य करायची. ती भारतात आली असता तिने उसगाव डोंगरीला भेट दिली होती. उसगाव डोंगरीचं ‘साने गुरुजी प्रशिक्षण संकुल’ पाहून तिला अमेरिकेतल्या हायलँडर रिसर्च सेंटरची आठवण झाली होती. त्यात योगायोग असा, की उसगाव डोंगरीच्या प्रशिक्षण संकुलाला साने गुरुजींचं नाव आहे. हायलँडर रिसर्च सेंटर हे मार्टिन ल्युथर किंग यांच्याशी घनिष्टतेने संबंधित आहे. साने गुरुजी आणि मार्टिन ल्युथर किंग यांचं प्रेरणास्थान एकच... ते म्हणजे, महात्मा गांधीजी. कॅथी आणि मेलनी या दोघींना दोन्ही प्रशिक्षण संकुलांमध्ये साधर्म्य वाटावं, याची कारणं काय असावीत? याची उत्सुकता मला होतीच. उसगाव डोंगरीचं प्रशिक्षण संकुल आम्ही आमच्यापरीने सुरू केलं होतं. त्याचं साधर्म्य थेट अमेरिकेतल्या हायलँडर रिसर्च सेंटरशी व्हावी, ही माझ्यासारखा छोट्या संघटकासाठी कुतूहलाची बाब होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com