Premium|Master Dinanath Life Story : मला हसताच येत नाही, पण गाता मात्र येतं...

Master Dinanath and Family Struggles : कंपनीचा लिलाव झाल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या मास्टर दीनानाथ आणि माईंनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला. नातेवाईकांची नाराजी, कुटुंबाची काळजी आणि कठीण काळातील माणुसकीचा हा भावनिक प्रसंग आहे.
Master Dinanath and Family Struggles :

Master Dinanath and Family Struggles :

esakal

Updated on: 

मास्टर दीनानाथ यांच्या कंपनीचा लिलाव झाला, देणेकरी आले, मात्र दीनानाथ स्थितप्रज्ञ होते. सगळ्यांना त्यांनी तोंड दिले, सगळ्यांनी पाठ फिवली होती, मात्र ज्या धीराने त्या परिस्थितीला माई आणि दीनानाथ यांनी तोंड दिले ते कल्पनेपलीकडचे होते. माईंच्या आई त्यांच्यावर रागावल्या, त्यांना बोलल्या पण माईंनी त्यांची समजूत घातली, त्यातच मास्टर दीनानाथ यांच्या बहिणींने त्यांना वेगळाच अनुभव सांगितला...

ताईबाई काहीतरी चिडून बोलणार होती,

तोच मी पुढे झाले, म्हणाले.

"ताईबाई ! आता शब्दाला शब्द वाढवू

नकोस. हे शंभर रूपये घे. तुम्ही १९ जण

आहात, पन्नास रूपयात थाळनेरला कसे

जाणार ? म्हणून मी १०० रूपये आणले आहेत.

उगाच धावपळ करू नका.

मालक म्हणतात, तसे उन्हाचे जाऊ नका.

जेवून घ्या, काल कंपनी बंद पडली, म्हणजे

आज इथल्या पंगती बंद पडल्या असे नाही.

जेवून घ्या. विश्रांती घ्या. उद्या पहाटे निघा."

"श्रीमती ! तुझी आई आहे मी. तुझे टोचून

बोलणे मला कळते. पण मी आई आहे.

तू आणि तुझा नवरा, या व्यवहारी जगात

कसे जगणार? याची चिंता वाटते.

Loading content, please wait...