Premium|Study Room : भारतीय समाज विषयात MPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीतींचा अवलंब कसा करावा?

MPSC Mains Exam Preparation : एमपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-१ मधील 'भारतीय समाज' विषयाच्या तयारीसाठी अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, दर्जेदार संदर्भपुस्तकांचा वापर आणि चालू घडामोडींच्या आधारे उत्तरलेखनाचा सराव करणे ही यशस्वी होण्याची सर्वात प्रभावी आणि सर्वोत्तम रणनीती ठरते.
MPSC Mains Exam Preparation

MPSC Mains Exam Preparation

esakal

Updated on

लेखक : सत्यजित हिंगे

भारतीय समाज विषयात उत्तम गुण मिळवण्यासाठी योग्य रणनीती! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नव्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन-१ (GS-1) मध्ये भारतीय समाज हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणारा घटक मानला जातो. या विषयामध्ये भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, विविधता, स्त्रियांची भूमिका, सामाजिक बदल, जागतिकीकरणाचे परिणाम, शहरीकरण, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या विषयांचा समावेश होतो. प्रशासनिक सेवांमध्ये काम करताना समाजरचना, सामाजिक समस्या आणि बदलांचे आकलन आवश्यक असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व दिले जाते. तसेच GS-1 मध्ये इतिहास, भूगोल आणि समाज या तिन्ही घटकांचा समावेश असल्याने परीक्षार्थ्याने समाजविषयक मुद्द्यांचे सखोल विश्लेषणात्मक आकलन विकसित करणे आवश्यक असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com