मुंबई: उत्तरप्रदेशच्या बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी सोमवारी जाहीर केले की त्यांनी पुतणे आकाश आनंद यांना पक्षाच्या आणि चळवळीच्या हितासाठी पक्षातून काढून टाकले आहे. आकाश आनंद याला त्याच्या सासऱ्यांप्रमाणेच, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. मायावती यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये याबाबत सांगितले.
याचे कारण देताना मायावतींनी पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ नसणे आणि कौटुंबिक वादाचे कारण दिले आहे. काही दिवसांपूर्वी याच मायावतींनी आपला पुतण्या आकाश आनंद याला आपला राजकीय वारस म्हणून घोषित केले होते. मात्र अचानक अशा कोणत्या घडामोडी घडल्या ज्यामुळे मायावती या निर्णयापर्यंत आल्या? यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून...