Premium|Medical Education Abroad : ‘मेड इन चायना’ वैद्यकीय शिक्षणाचा पेच; परदेशी एमबीबीएस, कमी दर्जा आणि भारतीय विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्तीची धडपड

MBBS Abroad for Indian Students : भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशातील एमबीबीएस हा अनेकदा कमी खर्चातील पर्याय ठरतो; मात्र शिक्षणाचा दर्जा, परतल्यानंतरची परीक्षा, पदव्युत्तर संधी आणि वैद्यकीय कारकिर्दीतील आव्हानेही महत्त्वाची आहेत.
MBBS Abroad for Indian Students

MBBS Abroad for Indian Students

esakal

Updated on

-डॉ. प्रवीण शिनगारे - माजी संचालक, महाराष्‍ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

देशात विविध व्यवसायांना प्रतिष्ठा असली, तरी समाज हा सर्वाधिक प्रतिष्ठा वैद्यकीय व्यवसायास देतो. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगतात. हे स्वप्न भारतात पूर्ण होणार नाही, असे दिसून आल्यावरच तो शेवटचा पर्याय म्हणून रशिया, चीन, युक्रेन, फिलिपाईन्स आदी देशांची एमबीबीएस होण्यासाठी निवड करतात. देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय शिक्षणापेक्षा परदेशात कमी खर्च येतो, तो मध्यमवर्गीयांना परवडणारा असतो. या एकाच कारणामुळे भारतीय विद्यार्थी परदेशात डॉक्टर होण्यासाठी जातात.

परदेशी डिग्रीचे महत्त्व का?

वैद्यकीय शिक्षण सोडून भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो, तेव्हा त्याच्याकडे सन्मानाने हुशार म्हणून पाहिले जाते; पण जर तो डॉक्टर होण्यासाठी परदेशात जात आहे, तेव्हा त्याच्याकडे निश्‍चितपणे कमी गुणवत्तेचा व मागल्या दाराने (बॅकडोअर एन्ट्री) डॉक्टर झालेला, असे पाहिले जाते. तरीही स्वप्नपूर्तीच्या यशासाठी हे स्वीकारले जाते. कारण, ही मानहानीची अवस्था तुटपुंज्या कालावधीसाठी असते. यातील कित्येक डॉक्टर परत आल्यावर भारतात पदव्युत्तर शिक्षण घेऊन किंवा सुपरस्पेशालिस्ट म्हणून चांगल्यापैकी आरोग्य सेवा देतात. मात्र, यामध्ये अपयशाचे प्रमाण जास्त आहे. कोणताही भारतीय विद्यार्थी भारतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत असताना तो परदेशात (रशिया, चीन आदी) डॉक्टर होण्यासाठी गेला, असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. हीच बाब भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा उच्च दर्जा दर्शवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com