Premium|Lata Mangeshkar : तुझा ऋतु, तुझी फुले, तुझाच हा सुवास का...

Childhood Struggles In Goa : ‘मी लता दीनानाथ’ लेखमालेत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गोव्यातील संघर्षमय बालपणाचा भावनिक प्रसंग उलगडतो. गैरसमज, आईची कठोरता आणि येशूमावशीच्या मायेने आयुष्याला नवे वळण मिळते.
Childhood Struggles In Goa

Childhood Struggles In Goa

esakal

Updated on

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची ‘मी लता दीनानाथ’ ही लेखमाला

स्थगित केली होती, या आठवड्यापासून ती लेखमाला आता

पुन्हा सुरू होत आहे. मागील भागांमध्ये मास्टर दीनानाथ यांचे

बालपण त्यांच्या समोरची आव्हाने हे सारे आले होते. त्यांच्या

जीवनातला गोव्याचा काळ पंडितजी सांगत आहेत. दीनानाथ

गुरुजींकडून घरी निघाले. वाटेत त्यांना एक पंडितजी भेटले, ते कोण

याचाही उलगडा झाला. ‘चकवा’ संपला, सारे मळभ दूर झाले. थकलेले दीनानाथ

घरी पोहोचले, पण घरी त्यांच्यासमोर वेगळेच काही वाढून ठेवले होते. काय होते त्यांच्यासमोरचे आव्हान?

श्रीमंगेश मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यावर

ओळीत लावित होत्या. त्या पायऱ्यासमोर एक घर.

एकमजली, सफेदी लावलेले, गरीबीच्या खुणा अंगावर

ल्यालेले. त्या घरात माझी मावशी राहायची,

माझा जन्म त्या घरात झाला. मी राहायचा

तो दुसऱ्याच वस्तीत, पण माझ्या आईला

मावशीने आग्रहाने या घरी आणले होते.

आणि तेथेच माझा जन्म झाला.

सगळे फार आनंदले,

कारण श्री मंगेशाच्या प्रवेशदारासमोर हे घर होते,

सर्व ते शुभ मानीत,

त्या घराकडे पाहत मी त्याच रस्त्याच्या

पुढे असलेल्या मंगेशीच्या सेवक वस्तीकडे

निघालो, आता दोन्ही बाजूला दाट झाडी,

दिवसा हिरवीगार दिसणारी, पण रात्री

मळकट हिरव्या, काळ्या रंगाने रंगून, भेडसावणारी.

ती झाडी संपताच आमची वस्ती.

फाटकी, छोटी, छोटी पण स्वच्छ घरं,

पण त्या स्वच्छतेवर दारिद्र्याची

मळकट पुटं चढलेली. एकेक अंगण,

एकेक जोत, एकेक ओटा आणि

एकेक घर, शुभ्र पांढऱ्या रंगाचे.

वस्तीने जणू सफेद पैरण, पैरहन

परिधान केली आहे, असा भास व्हायचा.

तो पांढरा रंग बघून मला पंडितजींचे शब्द

आठवले. ‘‘सुखात ठेवलं, की गुलामगिरीही

आवडू लागते.’’ गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात,

त्यांचा आवडता रंग पांढरा. मग गोवाही

सफेद रंगात बुडालेला. जे मालकाला भावते,

ते गुलामांना आवडायलाच लागते.

सारा परिसर, सारी वस्ती, सफेद कफन ओढलेल्या

जुन्या, पडक्या मशिदीच्या मजारसारखी भासत होती.

प्रत्येक सफेद घर,

जणू दारिद्र्य सटवाईचे एक पदचिन्हच.

नक्श फरियादी है

किसकी शोखी-ए-तहरीर का

कागजी है पहरन

हर पैकरे-तसवीर का

(हे मंगेशा ! आज आम्ही पांढऱ्या रंगाच्या

कागदाचे कपडे घातले आहेत आणि

त्या कागदी कपड्यावर आमची तक्रार,

फिर्याद लिखित नोंदवली आहे.

हा सारा परिसर पांढऱ्या कागदी कपड्यांनी

भरला आहे. म्हणजे प्रत्येकाने तुझ्याकडे

आपले गाऱ्हाणे, तक्रारी नोंदविल्या आहेत.

हे मंगेशा ! आम्ही तुझे ‘पदचिन्ह’

पण आमच अस्तित्व हेच मुळी एक गाऱ्हाणं

आहे. तू या दुष्ट जगात आम्हाला का बरे

आणले आहेस?)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com