

Importance of Home
esakal
एक शब्द : आशियाना... म्हणजे घर. शब्दच किती आशादायक. त्याची किती किती नावं... ठावठिकाणा, घरकुल म्हणा, घरौंदा, बसेरा म्हणा, महाल म्हणा अथवा झोपडी म्हणा... ते असतं घरच.
आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा, अन्न-वस्त्र-निवारा या जीवनावश्यक त्रयीमधील एक महत्त्वाचा घटक - म्हणजे घर. ते छोटं आहे की मोठं, मातीचं आहे की सिमेंटचं, राजवाडा आहे की झोपडी... काही फरक नाही पडत. महत्त्वाचं हे आणि एवढंच की, ते घर आहे आणि हक्काचं आहे. त्याचं महत्त्व आणि सौंदर्य त्यात राहणाऱ्यांनाच कळतं. नाही म्हणजे, इतरांनाही ते कळू शकेल; पण
त्यासाठी मागून घ्यावी लागेल त्या घरात राहणाऱ्यांची ‘नजर’...
ये तेरा घर, ये मेरा घर
किसी को देखना हो गर
तो पहले आ के मांग ले
मेरी नजर, तेरी नजर ...
अहाहा... क्या कहने जावेद साहब!
हे तुझं आणि माझं घर
कुणाला बघायचं
असेल जर -