Premium|menopause health clinic : महाराष्ट्रात रजोनिवृत्ती क्लिनिकची सुरुवात; महिलांच्या आरोग्याची नवी दिशा

menopause health clinic India : महाराष्ट्र आणि केरळ सरकारने रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू केले, जिथे महिलांना शारीरिक, मानसिक आरोग्य तपासणी, संप्रेरक संतुलन, औषधोपचार आणि जीवनशैली मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळेल.
menopause health clinic

menopause health clinic

esakal

Updated on

मंजूषा कुलकर्णी

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनॉपॉज... म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, संप्रेरक (हॉर्मोन) असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य यांकडे महिलांचे दुर्लक्ष होत असते. हीच गरज ओळखून राज्य सरकारने रजोनिवृत्ती तपासणी क्लिनिक सुरू केली आहेत.

महिलांच्या प्रजननाची प्रक्रिया नैसर्गिकपणे बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. ही एक नैसर्गिक अवस्था असून, तिचा परिणाम जगभरातील कोट्यवधी महिलांवर होतो. मात्र, तिच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक परिणामांकडे आरोग्य क्षेत्राने मर्यादितच लक्ष दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मते, रजोनिवृत्तीकडे अनेकदा वैद्यकीय प्राधान्य दिले जात नाही. या काळात अचानक गरम होणे, घाम फुटणे, भावनिक चढउतार, झोपेच्या तक्रारी, चिडचिड होणे, हाडांची घनता कमी होणे तसेच संप्रेरकांमधील असमतोल अशा लक्षणांबाबत अनेक महिलांना विश्वसनीय माहिती व योग्य उपचार मिळत नाहीत. ही गरज ओळखून महाराष्ट्र आणि केरळमधील राज्य सरकारांनी सरकारांनी रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांसाठी विश्‍वसनीय आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com