Premium|Psychological Fear:  युद्धामुळे हे सगळं जग आता संपणार आहे..! तुम्हाला सतत अशी भिती मनात येत असेल तर कदाचित तुम्हाला Anticipatory Anxiety असू शकते

Mental health in emergencies : अजून पुढे काय भयानक वाढून ठेवलंय या प्रश्नांची सतत एक टांगती तलवार डोक्यावर वावरत असल्यासारखं वाटतं. आणि यातूनच सुरूवात होते एका मानसिक भितीच्या चक्राची..!
psycological effect of war

psycological effect of war

Esakal

Updated on

पुणे – तिसरं महायुद्ध सुरू झालंय... इराणमध्ये काळा पाऊस पडलाय... एपस्टीनचे आणखीन भयंकर फोटोज समोर आलेत, गाझा अजूनही शांत झालेलं नाहीये...अशा बातम्या या तुमच्यात कळत नकळतपणे एकप्रकारची भिती तयार करतात.

जगात काय चाललंय याचा माझ्याशी काय संबंध असं म्हणण्याची सोय आता नाही. कारण तिकडे युद्ध सुरू झालं की इथे पेट्रोल डिजेलचा तुटवडा जाणवला, गॅस मिळणं कठिण झालं. रोज जे मोठमोठ्या व्यक्तींवर आरोप होतायेत त्यावरून भारताचा एपस्टीनशी काहीही संबंध नाही असंही म्हणता येत नाही..

या सगळ्या स्थितीत सोशल मिडियाच्या माध्यमातून येणारे लहान मुलांचे व्हिडिओ, लहानग्यांवर झालेले होत असलेले अत्याचार मन सुन्न करतात. आणि या सगळ्याची एक अनाहूत भिती मनात हळूहळू घर करू लागते आहे. २०२६ हे वर्षच मुळी अशा बातम्यांनी सुरू झालं असं वाटून हे युद्ध माझ्या दाराशी येऊन ठेपेल का, आमच्या मुलाबाळांच काय होईल, ही महागाई जगू देईल, पुढे अजून काय भयानक वाढून ठेवलंय या प्रश्नांची सतत एक टांगती तलवार डोक्यावर वावरत असल्यासारखं वाटतं. आणि यातूनच सुरूवात होते एका मानसिक भितीच्या चक्राची. Anticipatory Anxiety ची..!

अशा प्रकारची चिंता फक्त तुम्हालाच होते का की जगात अनेक लोकांमध्ये निर्माण होते, या भितीचं पुढं चिंतेत रूपांतर होऊन याचे मानसिक शारिरीक परिणाम काय होतात, अशी भिती कशामुळे निर्माण होते, त्यावेळी मेंदूत नेमकं काय घडतं आणि हे घालवणं शक्य नसलं तरी हे कमी कसं करायचं.. या सगळ्या प्रश्नांची मानसशास्त्रीय कारणं शोधयचा प्रयत्न या सकाळ+ च्या विशेष लेखात करूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com