Premium|Vijay Tendulkar and Milind Shinde : ‘शांतता कोर्ट चालू आहे’पासून ‘सखाराम’पर्यंत; विजय तेंडुलकरांच्या मायेने घडलेला मिलिंद शिंदेचा रंगप्रवास

Marathi Theater and Cinema : प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या अभिनय प्रवासातील एक भावूक वळण! 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' मधील कामाचे खुद्द विजय तेंडुलकरांनी केलेले कौतुक आणि वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी त्यांच्या कारकिर्दीला दिलेली नवी उभारी; वाचा हा हृदयस्पर्शी प्रवास.
Vijay Tendulkar and Milind Shinde

Vijay Tendulkar and Milind Shinde

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

‘‘हा काळा कोण आहे?’’

‘‘थिएटरचा आहे वाटतं. हे थिएटरवाले थोडे असतात बरं का... थोडे असे...’’

प्रभात थिएटरला ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमाचा खेळ चालू होता. माझा पहिला सिनेमा थिएटरला लागला होता आणि आम्ही आमच्या घरचे मी, आई-वडील (ते नाखुशीने आले होते) आणि माझा एक मित्र सुनील शिखरे सिनेमाला आलो होतो. सिनेमा सुरू होता. आमच्यासमोर बसलेले ते प्रेक्षक आधी सिनेमाबद्दल चर्चा करत होते. नंतर विनोद आणि थोड्या वेळानं ते शांत झाले. सिनेमाचा भाग झाले. शांतपणे सिनेमा पाहू लागले. थिएटरमध्ये काही लोक होते; पण कालांतराने ते सगळे सिनेमाचा भाग झाले आणि हे फक्त ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’चा प्रश्न नाही, तर हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे हे काहीतरी महत्त्वाचं हा सिनेमा सांगतोय हे त्यांना पटलं असावं. आमच्या पुढे बसलेले प्रेक्षक अधूनमधून मागे पाहायला लागले. इंटरव्हलमध्ये त्यांना कळलं, की तो जो कुणी ‘काका’ आहे तो आपल्यामागेच बसला आहे... उत्तरार्धात मग ते पुन्हा-पुन्हा मागे पाहू लागले.

‘‘अरे तोचंय.’’

सिनेमा संपला. बाहेर आलो. जाताना उशीर झाला म्हणून घाईघाईनं गेलो होतो. बाहेर आल्यावर पाहिलं पुण्याच्या प्रभात टॉकीजवर सिनेमाचं भलंमोठं पोस्टर लागलेलं होतं... नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना आम्ही सहअध्यायी एकमेकांशी गमतीत शर्यत लावत असू. ‘‘किसका पोस्टर पहले लगेगा?’’ इथं पोस्टर लागलं होतं आणि त्या पोस्टरवर मी होतो. बरं वाटलं. गर्दी झाली. लोकांनी ओळखलं होतं. काही महिला-पुरुष सह्या घ्यायला आले. मला हे नवीनच. पहिली सही देताना आधी मनात सही तयार केली. तरी समोरच्या प्रेक्षकानं दिलेल्या कागदावर करण्याचा प्रयत्न केला. २०-२५ सह्या केल्या असतील. सही देताना सही शिकलो. समोरचे सह्या घेणारे प्रेक्षक बाजूला सरले तसे प्रभातच्या पार्किंगमध्ये वडील रडताना दिसले. मग मला बघून पाठमोरे झाले; पण पाठ हलतच होती. हुंदके पाठीत मावतच नव्हते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला मिठी मारली. हुंदके त्यांच्या डोळ्यांतून माझ्या खांद्यावर ओघळू लागले. बराच वेळ. बऱ्याच दिवसांत कोंडलेलं. माझ्या खांद्यावर रेलू लागलं. त्या पाण्यानं मशागत केली, पुढच्या प्रवासाची. मला त्यांनी माझ्यावर रागावून डोकं जमिनीवर आपटून घेतलं होतं. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तो जमिनीवर गळत होता. हे चित्र आठवलं. मी ते ताबडतोब पुसून टाकलं. मिठी घट्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com