
एम. एन. एस. कुमार
नुकत्याच हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेवरून तेलंगणमध्ये राजकारण सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनावरून तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्रसमितीने तेलंगण सरकारवर जोरदार टीका केली आहे. आयोजनातील त्रुटी, स्पर्धकांशी झालेले गैरवर्तन असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा ठपकाही तेलंगण सरकारवर ठेवण्यात आला आहे. या वादाबद्दल...
तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे नुकतीच ‘मिस वर्ल्ड २०२५’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जागतिक सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करून सोबतच पर्यटन, संस्कृती आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याचा एक ब्रँड तयार करण्याचा यामागे उद्देश होता.