Caffeine side effects

Caffeine side effects

esakal

Premium| Caffeine side effects: चहा कॉफीचा आरोग्यावर काय परिणाम होतो? कॅफिनसेवनाबाबत तज्ज्ञ सांगतात की...

Tea coffee health benefits: चहा आणि कॉफीमधील कॅफिन शरीराला तात्पुरती ऊर्जा देते पण अति सेवन केल्यास झोप, चिंता आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते योग्य प्रमाणात घेतल्यास कॅफिन फायदेशीर ठरू शकते
Published on

तुम्ही जर अतिप्रमाणात चहा कॉफी पित असाल तर तुम्हाला झोपेचे विकार, पचनसंस्थेचे विकार आणि रॅबडोमायोलिसिस सारखे भयंकर आजार होऊ शकतात. या आजारामध्ये किडनीफेल होण्याची शक्यता असते. काही लोकांना असं वाटतं की कॅफीनमुळे भूक लागत नाही म्हणजे चहा-कॉफीने वजन कमी करता येईल. पण आहारतज्ज्ञ पियूष यादव सांगतात की, जेव्हा कॅफीन, साखर आणि दूध एकत्र घेतलं जातं तेव्हा वजन कमी होण्यऐवजी वजन वाढतं. चहा-कॉफीचे जसे तोटे आहेत तसे काही फायदे सुध्दा आहेत.

अमेरिकन एम.डी डॉ. स्टीफन डिव्ह्रिस सांगतात की, चहा कॉफीतील पॉलीफेनॉल या अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी पदार्थामुळे हृदयविकार आणि टाइप-२ डायबेटिसचा धोका कमी होतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे न्यूरोलॉजिस्ट शॅनन किलगोर सांगतात की, कॉफी जर प्रमाणात आणि ठराविक वेळेच्या अंतराने घेतली तर कॉफी तुमच्या शरीरासाठी एखाद्या चांगल्या औषधाप्रमाणे उपयुक्त ठरू शकते. अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशननुसार सामान्यत: दररोज ४०० मिलीग्रॅमपर्यंत कॅफीन प्रौढांसाठी सुरक्षित मानले जाते.

या विषयासंबंधी आम्ही डॉ. सौरव मांगडे यांच्याशी बोललो असता ते म्हणाले की, काही औषधे चहा कॉफीबरोबर घेतल्याचा त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. ही औषधे नेमकी कोणती? शिवाय आहारतज्ञ पियूष यादव यांच्यामते महिलांच्या आरोग्यावर चहा-कॉफीचा काय परिणाम होतो? हे जाणून घ्या सकाळ+च्या या लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com