
सुनील चावके
आधी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडणे आणि नंतर थेट ‘इंडिया आघाडी’च्याच एकजुटीला छेद देणे, अशी केंद्रातील मोदी सरकारची व्यूहरचना दिसते. परदेशांत पाठवायच्या शिष्टमंडळाच्या निवडीपाठोपाठ ‘नीती आयोगा’च्या बैठकीच्या निमित्ताने त्याचीच प्रचिती आली. ही मुत्सद्देगिरी कितपत उपयुक्त ठरते, हे भविष्यातील घडामोडींतून उलगडणार आहे.