Premium| Moltbook: मोल्टबुक हे एआय एजंट्ससाठी तयार केलेले अनोखे सोशल नेटवर्क आहे जिथे माणसे फक्त निरीक्षक असतात

AI Social Network: रेडिटसारख्या संरचनेवर आधारित मोल्टबुकवर हजारो एआय एजंट्स सक्रिय आहेत. स्वयंचलित एआयच्या भविष्यातील शक्यता आणि संभाव्य धोके या प्लॅटफॉर्ममुळे चर्चेत आले आहेत
Moltbook

Moltbook

esakal

Updated on

आजच्या ‘एआय’ युगात सोशल नेटवर्क्स व त्यावरचे आभासी कट्टे बहुतांश माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘एआय’ जगतात ‘मोल्टबुक’ नावाचे एक सोशल नेटवर्क अवतरले आणि एकच खळबळ माजली.

काय आहे हे मोल्टबुक?

‘मोल्ट’ या धातूचा शब्दशः अर्थ होतो ‘कात टाकणे’. ही प्राण्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची जैविक प्रक्रिया आहे, ज्यात प्राणी आपल्या शरीरावरील जुना बाह्य थर (त्वचा, पिसे किंवा कवच) काढून टाकतात आणि त्याजागी नवीन थर तयार होतो. नुकत्यातच ‘मोल्टबुक’ या प्रयोगात्मक एआय-आधारित प्लॅटफॉर्मच्या रूपात सोशल नेटवर्क्सनेही जणू कात टाकली असल्याचं दिसून येत आहे, कारण ‘मोल्टबुक’ हा सोशल नेटवर्कचा प्लॅटफॉर्मच असला तरी इथे माणसांना पोस्ट करण्याची परवानगी नाही. हा प्लॅटफॉर्म ‘केवळ एआय एजंट्सकरिता’ आहे. ‘Humans welcome to observe’ अर्थात ‘इथे माणसे फक्त प्रेक्षकांप्रमाणे स्क्रोल करून पाहू शकतात, सक्रिय सहभागी होऊ शकत नाहीत’ असं मोल्टबुकच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे.

‘मोल्टबुक’विषयी जाणून घेताना ‘एआय’ एजंट हा केवळ निर्बुद्ध मशीन नसून एक स्वयंचलित बुद्धिमान घटक आहे हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. ‘एआय’ एजंट हा हुशार डिजिटल मदतनीस पारंपरिक चॅटबॉट्सप्रमाणे फक्त आदेश पाळत नाही, तर विचार करतो, निर्णय घेतो आणि स्वतःहून कृती करतो. ‘एआय’ एजंट्स हा एक साँफ्टवेअर प्रोग्राम असला तरी तो ‘सांगकाम्या’ प्रोग्रॅम नव्हे. तर, ‘काय करायला हवं’ हे स्वतः ठरवण्याची बुद्धिमत्ता आणि क्षमता त्याच्याकडे आहे. थोडक्यात, ‘एआय’ एजंट जणू एखाद्या अशा ड्रायव्हरसारखा आहे जो नुसता रस्त्यावरून गाडी चालवत नाही तर ‘जीपीएस’चा वापर करून गरज भासल्यास ट्रॅफिक टाळण्यासाठी रस्ता बदलतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com