Premium|Money and Financial Freedom : पैसा कमावण्यासोबत बचत आणि योग्य खर्चाचे नियोजनही महत्त्वाचे

Money and Financial Independence : पैसा केवळ गरजा पूर्ण करण्याचे साधन नसून तो आर्थिक स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद देतो. बचतीची सवय, खर्चाचे नियोजन, ऑनलाइन व्यवहारांतील सावधगिरी आणि पैशासोबत आनंद जपण्याचे महत्त्व या लेखातून मांडले आहे.
Money and Financial Freedom

Money and Financial Freedom

esakal

Updated on: 

पैसा हे आर्थिक स्वातंत्र्याचे साधन

अभिरुची तळतकर, बीएस्सी, इकॉनॉमिक्स

पैसा हा सर्वांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पैसा हा फक्त गरजा पूर्ण करण्याचा साधन नव्हे, तर ते स्वातंत्र्य, इच्छा व आवडी आणि जीवन सुरक्षित ठेवण्याचे साधन आहे. आर्थिक स्वातंत्र्य असणे खूप गरजेचे आहे, खासकरून महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि कोणावर अवलंबून नसणं हे महत्त्वाचे. पैसा आपल्याला बाकी सर्व आवडी पूर्ण करून देऊ शकतो; पण जर आपल्याला आनंद मिळत नसेल तर तो व्यर्थ आहे. वर्षाची जेवढी कमाई आहे तेवढीच पैशाची बचत होणे ही गरजेचे आहे. स्वतःसाठी, आई वडिलांसाठी घर, गाडी, विविध वस्तू घेणे आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कष्टाची तयारी असणे गरजेचे आहे, असे मला वाटते. ऑनलाइन पेमेंटमुळे पैसे कसे खर्च होतात, कळत नाही. त्यामुळे त्याचा वापर व्यवस्थित करणे गरजेचे आहे. पैशानं कितीही श्रीमंत झालं, तरी आपले पाय कायम जमिनीवर टिकवून ठेवले पाहिजेत, अशी माझ्या आई-वडिलांची शिकवण आहे. कितीही पैसा आला, तरी माणसाची किंमत त्याचा स्वभावावरून, कामावरून आणि विचारावरून समजून येते. कितीही पैसा कमावला, तरी तो कुठे खर्च करावा, कुठे बचत करावी आणि त्याचा वापर कसा असावा, हे सर्वांनी समजणं गरजेचे आहे. आपल्या कष्टाचं फळ आज नाही, तर उद्या मिळणारच आहे म्हणून आनंदी राहणं आणि योग्य ते कष्ट करून आयुष्य जगणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

वेळ आणि निर्णयस्वातंत्र्य यासाठी पैसा हवा!

आत्मज पासलकर, बीएस्सी इकॉनॉमिक्स

माझ्यासाठी पैसा म्हणजे आधी स्वातंत्र्य. एखाद्या गोष्टीला नाही म्हणता येणं आणि हवं तेव्हा ‘चल, करूया’ म्हणता येणं. आणि दुसरं म्हणजे अनुभव. एखादी ट्रिप, काहीतरी नवं शिकणं, आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ, हे सगळं कपाटात ठेवता येत नाही; पण कायम आठवणीत राहतं. म्हणून वस्तू घेण्यापेक्षा अनुभवांवर खर्च करायला मला जास्त आवडतं. माझ्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे माझे खर्च मी स्वतः भागवू शकणं आणि आवडीचं काम निवडताना ‘पगार कमी मिळाला तर?’ याचं टेन्शन कमी असणं. माझा वेळ आणि माझे निर्णय माझ्या हातात असणं, हीच खरी श्रीमंती वाटते मला. पैशाबद्दलचं माझं मत आयुष्याच्या टप्प्यानुसार बदलत जातं. कमाईइतकंच नव्या गोष्टी शिकणं आणि अनुभव घेणं मला महत्त्वाचं वाटतं. पुढे जबाबदाऱ्या वाढल्या, की कदाचित प्राधान्यक्रम बदलेलही. आधी बचत, मग जे उरेल त्यात खर्च, असं मी ठरवलंय. ‘एसआयपी’ मला याच कारणामुळे आवडते, कारण त्यात पैसे आपोआप जातात, वेगळा विचार करावा लागत नाही. गुंतवणूक म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही, तर भविष्यासाठी पैसे हळूहळू वाढवत नेणं, असं मी मानतो. माझ्या आई-बाबांनी आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत केली, मी स्वातंत्र्यासाठी करतो. कारणं वेगळी असली, तरी पैशाची किंमत ओळखणं हे दोघांतही सारखंच आहे. पुढच्या दहा वर्षांत मला असं आयुष्य हवंय, जिथे मी आवडीचं काम निवडू शकेन आणि हवं तेव्हा मनसोक्त फिरू शकेन. त्यासाठी आजपासूनच शिस्तीत बचत करायला आणि विचार करून खर्च करायला मी तयार आहे.

Loading content, please wait...