Premium|Stock Market Recommendations : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कोणते शेअर निवडावेत? जाणून घ्या तज्ज्ञांच्या शिफारसी

Share Market Investment Tips : जागतिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसाठी मोतीलाल ओसवालने कमिन्स इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलसह १० निवडक शेअर्सची शिफारस केली आहे. मजबूत ताळेबंद आणि भविष्यातील विकासाचा अंदाज लक्षात घेता हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
Stock Market Recommendations

Stock Market Recommendations

sakal

Updated on

सिद्धार्थ खेमका- (मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )

जागतिक भू-राजकीय अस्थिरतेमुळे जागतिक शेअर बाजारात आणि भारतीय शेअर बाजारातही सतत चढ-उतार होत आहेत. सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. अशावेळी शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणते शेअर निवडावेत, असा प्रश्‍न गुंतवणूकदारांना पडत आहे. त्यासाठी काही निवडक शेअरची शिफारस येथे केली आहे.

कमिन्स इंडिया (उद्दिष्ट : रु. ४९५०)

उत्पादन, रिअल इस्टेट, हेल्थकेअर, हॉटेल्स आणि डेटा सेंटर या क्षेत्रांतून वाढणाऱ्या मागणीमुळे पॉवरजेन क्षेत्रात सुधारणा होत असून, त्याचा फायदा कमिन्स इंडियाला बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी होणार आहे. रेल्वे, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रांतील नव्या उत्पादनांमुळे अर्थवर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान औद्योगिक वाढीचा चक्रवाढ वार्षिक विकासदर (सीएजीआर) सुमारे १८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. जागतिक मागणीच्या बळावर, विशेषतः डेटा सेंटर आणि कमी अश्वशक्तीच्या (लो-एचपी) विभागात निर्यातीत वाढ सुरू राहील. अर्थवर्ष २०२५ ते २०२८ या काळात महसूल, ‘ईबीआयटीडीए’ आणि निव्वळ नफा यांचे ‘सीएजीआर’ अनुक्रमे १६ टक्के, १६ टक्के आणि १७ टक्के राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com