Premium|Mukesh Musical Journey : दर्दभऱ्या सुरांची अजरामर कहाणी!

Mukesh Musical Journey : मुकेश यांच्या मोजक्या पण अजरामर गीतांनी हिंदी चित्रपटसंगीताला वेगळी ओळख दिली. दर्द, आर्तता आणि आपलेपणाने भरलेल्या त्यांच्या स्वरयात्रेला ५०व्या स्मृतिदिनी उजाळा.
Mukesh Musical Journey

Mukesh Musical Journey

esakal

Updated on

धनंजय कुलकर्णी - sakal.avtaran@gmail.com

प्रसिद्ध गायक मुकेश यांनी इतरांच्या तुलनेत मोजकीच गाणी गायली; परंतु त्यातील अनेक आजही अजरामर आहेत. मुकेश यांच्या स्वरात दर्द, आर्तता आणि एक विलक्षण आपलेपणा होता. तरीही अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांचा स्वर मोजकाच वापरला... संख्येच्या स्पर्धेपासून दूर राहूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मुकेश यांचा २७ ऑगस्ट रोजी ५०वा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामध्ये, प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण, आदराचे आणि अलौकिक असे राहिलेले आहे. आजच्या डिजिटल युगात आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जेव्हा सर्व गायक, संगीतकार आणि गीतकार यांचे अधिकृत ‘गीतकोश’ आणि सांख्यिकी सहज उपलब्ध झाली आहे, तेव्हा आपल्याला अगदी तंतोतंत समजते, की कोणत्या गायकाने कोणत्या संगीतकाराकडे नेमकी किती गाणी गायली, कुणासोबत किती युगलगीते गायली आणि कुणाच्या कारकिर्दीत कुणाचा सहभाग किती प्रमाणात राहिला. अशा प्रकारच्या सर्व वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहितीमुळे आपल्याला कोणत्याही कलावंताच्या सांगीतिक कारकिर्दीचे अत्यंत तटस्थपणे, निष्पक्षपणे आणि सखोल विश्लेषण करणे शक्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com