Premium|Mulher Fort : मोगलांनी ७ वर्षे वेढा घातला, पण मुल्हेर झुकला नाही! औरंगजेबालाही धूळ चारणाऱ्या या 'अजिंक्य' किल्ल्याची शौर्यगाथा

Maratha Architecture Forts : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ऐतिहासिक 'मुल्हेर' दुर्ग हा मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असून, मोगलांच्या सात वर्षांच्या वेढ्यालाही न जुमानणारा हा अजिंक्य किल्ला आजही आपला प्राचीन सांस्कृतिक आणि लष्करी वारसा दिमाखात जपत आहे.
Maratha Architecture Forts

Maratha Architecture Forts

esakal

Updated on

डॉ. श्रीमंत कोकाटे- shrimantkokate1@gmail.com

ज्या गडदुर्गांनी मराठ्यांचा इतिहास घडविला, रक्षिला आणि संवर्धित केला त्यात मुल्हेर गडाचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तथा बागलाण तालुक्यात असलेल्या या गडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गिरीदुर्ग प्रकारात असलेला मुल्हेर दुर्ग अजिंक्य आणि अभेद्य आहे.

दक्षिण भारताची अस्मिता, स्वाभिमान, स्वातंत्र्य, भाषा, संस्कृती यांच्या रक्षणात गडदुर्गांचा मोठा वाटा आहे. गडदुर्गांच्या मदतीने अनेक शतके दाक्षिणात्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर निर्जीव गडांना अन्यायाविरुद्ध कसे लढायचे, याचे बाळकडू दिले. ज्या गडदुर्गांनी मराठ्यांचा इतिहास घडविला, रक्षिला आणि संवर्धित केला त्या गडामध्ये आहे कान्हादेशातील (खान्देश) मुल्हेर दुर्ग! कानबाई ही बागलाणच्या प्राचीन स्त्री राज्याची महाराणी होती. तिच्या नावावरून कानदेश हा शब्दप्रयोग रूढ झाला, त्याचा अपभ्रंश पुढे खानदेश झाला. असे अभ्यासकांचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com