Premium| Living Room Furniture: लिव्हिंग रूममधील फर्निचर निवडताना...

Multifunctional furniture: लिव्हिंग रूमची सजावट कशी करावी? बैठकीच्या खोलीत फर्निचर निवडताना काय लक्षात घ्यावे?
Living Room Decor
Living Room Decoresakal
Updated on

प्रतिनिधी

ज्या खोलीशिवाय घर अपूर्ण असते, ती म्हणजे बैठकीची खोली किंवा हल्लीच्या भाषेत लिव्हिंग रूम. आपण या खोलीला सरसकट ‘हॉल’ही म्हणतो. आपण घरात प्रवेश करतो तो लिव्हिंग रूममधूनच. याच खोलीमध्ये घरातल्या सगळ्यांचाच सर्वाधिक वावर असतो. गप्पा, चर्चा, मनोरंजन, कधीकधी जेवणसुद्धा याच खोलीत होते. ‘अतिथी देवो भव’ अशी संस्कृती जपणाऱ्या आपल्या भारतीयांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, त्यांची सरबराईही आपण याच खोलीत करतो. म्हणूनच, घरातली ही दर्शनी खोली उठून दिसावी यासाठी तुम्ही-आम्ही सगळेच प्रयत्नशील असतो. त्यासाठी या खोलीतले फर्निचर निवडताना, खोलीची सजावट करताना परंपरेचा स्पर्श, आधुनिक सोयी आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ घडवून आणला, तर तुमची लिव्हिंग रूम ही घरातली सर्वात उठून दिसणारी खोली ठरू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com