

Air Pollution in Mumbai
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
आपण घेत असलेला श्वास शुद्ध हवेचा मिळावा, यासाठीही भविष्यात पैसे मोजावे लागले तर आश्चर्य वाटायला नको किंवा मग असलेल्या अशुद्ध हवेचा श्वास घेऊन पुढे भविष्यात आरोग्यावर होणाऱ्या उपचारांसाठीचा खर्च तरी किमान खिशाला परवडेल, अशी तजवीज करून ठेवलेली बरी! नाही का?
कोणत्याही शहरात राहत असताना आपण तिथे फक्त पैसा कमवत नाही. पैशांसोबत आपण तिथे वेळ आणि कष्टही खर्च करत असतो. अशा वेळी आपल्या जगण्याची गुणवत्ता किती आहे, त्या गुणवत्तेचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम काय आणि त्या परिणामांची काय किंमत आपण मोजतो आहोत, याचा थोडा विचार आपण करणार आहोत की नाही..?
दिवाळीनिमित्त फटाके फुटले. नंतर शहरातील प्रदूषण किती वाढलं होतं, यावर असंख्य पोस्ट सोशल मीडियावर दिसल्या. एका दिवसाचं प्रदूषण किती सिगारेट्सच्या बरोबरीचं होतं, याचीही माहिती अनेक जण सांगू लागले. फटाके फोडल्यानंतर एका रात्रीत एक्यूआय वाढला म्हणून त्या प्रदूषणामुळे भयंकर जीवघेणे आजार तत्काळ होतात, असा निष्कर्ष निघत नाही. पण, ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. हळहळू वाळवी वाढते आणि नंतर किती मोठा घात करते, हे उदाहरण तर आपल्याला माहीत आहेच!