
विनोद राऊत
मुंबई महापालिकेसह राज्यातील २३ महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चुरस असणार आहे, ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा काही छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती असाव्यात यासाठी सर्वच पक्षानी आपली कंबर कसली आहे. मात्र मुख्य लढत भाजप विरुध्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असणार आहे. यावेळी कुठल्याही परिस्थितीत मुंबई पालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी भाजप सज्ज आहे.