
‘मुंबई स्टार’ या नाटकात अवेंदू मुखर्जी (देव) आणि अरुषी निगम (कोयल) कलाकारांच्या भूमिकांसह ध्रुव घाणेकरचं अफलातून संगीत आणि इशिता अरुणच्या समर्पक गीतांमुळे प्रयोगाची परिणामकारता वाढली आहे. या सोबत अवंतिका बहल यांच्या नृत्य दिग्दर्शनाचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्याबरोबरीने अर्घ्य लाहिरी यांच्या प्रकाशयोजनेने नृत्याभिनयाचा हा नाट्याविष्कार देखणा झाला आहे.
विविध नाट्यप्रयोगांसाठी आदित्य बिर्ला उद्योग समूहातर्फे जी मदत केली जाते त्यातून रसिकांसमोर आलेले एक प्रेक्षणीय नाटक म्हणजे ‘मुंबई स्टार’. या हिंदी आणि इंग्रजीत सादर होत असलेल्या नृत्य-संगीत नाटकाच्या कथानकात नावीन्य नसले तरी या नाटकाचे सादरीकरण अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक झाले आहे.