Premium|Murud Janjira Fort History : जंजिरा किल्ला; रामा कोळी पाटलांच्या शौर्यापासून सिद्दींच्या अत्याचारांपर्यंतचा इतिहास

Janjira Fort Facts : सिंधुसागरातील अभेद्य जंजिरा किल्ल्याचा इतिहास, रामा कोळी पाटील यांचे शौर्य, पीरमखानाची दगाबाजी आणि सिद्दींच्या अत्याचारांची साक्ष देणाऱ्या जलदुर्गाचा सविस्तर वेध.
Murud Janjira Fort History

Murud Janjira Fort History

esakal

Updated on

डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com

सिंधुसागराच्या अथांग लाटांमध्ये आजही दिमाखाने उभा असलेला जंजिरा किल्ला म्हणजे अभेद्य जलदुर्ग, पराक्रम आणि संघर्षाचा जिवंत इतिहास आहे. शौर्य आणि स्थापत्यकौशल्याचा अनोखा संगम असलेला हा जलदुर्ग आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.

भारताच्या पश्‍चिम समुद्रकिनाऱ्यावर सिंधुसागरात असलेला जंजिरा किल्ला हा भक्कम, बुलंद आणि अभेद्य जलदुर्ग म्हणून ओळखला जातो. मुरूड गावापासून जवळ असल्यामुळे याला मुरूड-जंजिरा असेही म्हटले जाते. हा दुर्ग मराठा, बहमणी, निजाम, आदिलशहा, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षाचा साक्षीदार आहे. तो सिद्दीने बांधला; सिद्दीचाच आहे, असा एक गैरसमज जनतेमध्ये आहे. आफ्रिकेतील इथिओपियामधील हबश येथून आलेले म्हणून त्यांना ‘हबशी’ म्हटले जाते. ते सय्यदी लोक होते. सय्यदीचा अपभ्रंश ‘सिद्दी’ असा झाला. सिद्दींनी अत्यंत क्रूरपणे कोळ्यांचा जंजिरा बळकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com