
प्रवीण वानखेडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून उपराजधानीला विकासाचे बळ मिळत आहे. नवनवीन योजनांच्या माध्यमातून निधीचा झरा कायम वाहत असतो. महानगर पालिकेवर प्रशासकराज आल्यानंतर विकासाचा आलेख सतत वाढत आहे. प्रशासकाने सलग चार अर्थसंकल्प सादर केले. अर्थसंकल्पात खर्चाच्या रक्कमेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षाचा म्हणजे आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा आजवरच्या सर्वाधिक खर्चाचा अर्थसंकल्प मनाला जातो. वर्ष २०२२ पासून महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पा प्रशासकच सादर करीत आहेत.