
ज. वि. पवार
sakal.avtaran@gmail.com
दलित पँथरचे झुंजार नेते अशी ओळख असलेले ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या कविता ‘चल हल्ला बोल’ चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत; मात्र सेन्साॅर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला आहे. ढसाळ यांनी आपल्या कवितांमधून समाजातील दाहक वास्तवावर थेट भाष्य केले होते. आता त्याच कविता चित्रपटातून वगळण्याचा आदेश देत सेन्सॉर बोर्डाने एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घातला आहे.