
७० तास काम
भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे असेल, तर भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे, असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे आग्रही मत आहे.
मागील वर्षभरात त्यांनी अनेकदा यावर भाष्यही केले; परंतु आठवड्याला ७० तास म्हणजे पाच दिवसांचा आठवडा मोजल्यास दररोज १४ तास, तर सहा दिवसांचा आठवडा मोजल्यास दररोज साधारणतः १२ तास काम करावे लागणार आहे. सध्या आपल्याकडे दररोज सरासरी आठ तास काम केले जात असताना, किमान चार ते सहा तास जादा काम करावे लागेल.
भारतीयांच्या दृष्टीने हे कितपत शक्य आहे, तसे केल्यास भारताला आणि अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल, त्याचा कर्मचाऱ्यांवर आरोग्यविषयक आणि अन्य काय दुष्परिणाम होतील, जगातील इतर देशांमध्ये किती तास काम केले जाते, तसेच कमीत कमी तासांत जास्तीत जास्त काम कसे करता येईल, याबाबतचा सविस्तर आढावा...