

Medical Representative Labor Law
esakal
नरसय्या आडम
औषध कंपन्यांचे प्रतिनिधी अर्थात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या समस्या माझ्यासमोर आल्या. या प्रतिनिधींनी संघटना तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कंपन्यांकडून त्यांची पिळवणूक करण्यात येत होती. या प्रश्नावर मी सरकारकडे पाठपुरावा करत विधिमंडळात खासगी विधेयक मांडले आणि ते मंजूर होऊन राज्यात विशेष कायदा मंजूर झाला.