

Naseeruddin Shah
esakal
नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत सलग पंधरा दिवस आणि काही रात्री कुठलंही वही-पेन नाही, जणू अभिनय शिक्षणाचा जागरच सुरू झाला. वॉन्ट, इंटेन्शन आणि अर्जन्सी या तीन शब्दांभोवती फिरणारा
सगळा वर्ग फिजिकल वॉन्टपासून त्यांनी इमोशनल वॉन्टपर्यंत नेला...
हॉस्टेलच्या मेन गेटवर एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी येऊन थांबली. विखुरलेले आम्ही सगळे एका ठिकाणी जमा झालो. त्या गाडीच्या दाराकडे आम्हा सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दार उघडलं आणि गाडीतून नसीरुद्दीन शाह सर उतरले. नगरसारख्या छोट्या शहरातून दिल्लीला गेलेलो. मी डोळे मोठे करून त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होतो. आम्ही सगळे स्तब्ध. आमच्यातल्या जवळपास सगळ्यांनी पहिल्यांदाच नसीरुद्दीन शाह यांना पाहिलं होतं.