

Nashik Municipal Corporation Ghantagadi Project
esakal
प्रकाश मते माजी महापौर, नाशिक
मी महापौर असताना शहरांमध्ये कचरा घंटागाडी उपक्रम सुरू केला. हा उपक्रम अद्यापही सुरू आहे या माध्यमातून शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे याचा अभिमान वाटतो. घंटागाडी व शहर कचरा कुंडी मुक्त करण्याचा पॅटर्न राज्यातील अन्य शहरांबरोबरच देशातील इतर राज्यांनी देखील स्वीकारला. ज्या घंटागाडी संकल्पनेचा उगम नाशिक मधून झाला. त्या नाशिकमध्ये भविष्यात ही सेवा सक्षमपणे सुरू ठेवणे आवश्यक आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक संपून अखेर लोकप्रतिनिधींची कारकीर्द सुरू होत आहे. जवळपास चार वर्षांच्या अंतराने लोकप्रतिनिधी महापालिकेच्या सभागृहात पाऊल ठेवतील. चार वर्षांच्या संपणाऱ्या वनवासानंतर नव्याने कारकीर्द सुरू होणाऱ्या लोकनियुक्त सदस्यांची शहराच्या विकासाला गती व आकार देण्याची मोठी जबाबदारी आहे व ‘कॅप्टन’ म्हणून नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी महापौर व त्यानंतर उपमहापौरांवर आहे. मुंबई व पुणे नंतर गतीने वाढणाऱ्या नाशिकच्या विकासाचे नियोजन आत्ताच केले नाही तर शहराच्या संभावित बकालपणावरून भावी पिढी माफ करणार नाही. याची नोंद घेणे महत्त्वाचे ठरेल.