Premium|Navi Mumbai Pollution : नियोजनबद्ध शहराला प्रदूषणाचा विळखा

Environmental Conservation : नवी मुंबईतील वाढते प्रदूषण, धुलीकणांचे घातक प्रमाण आणि विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणासमोर उभी ठाकलेली आव्हाने यांवर उपाय म्हणून महापालिकेने २१०० कोटींचा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प आणि इलेक्ट्रिक बस ताफा वाढवण्यावर भर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Navi Mumbai Pollution

Navi Mumbai Pollution

esakal

Updated on

सुजित गायकवाड

महाराष्ट्रातील नियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. वाढती बांधकामे, वाहनांची वाढणारी संख्या आणि उद्योग यांमुळे नवी मुंबईलाही प्रदूषणाचा विळखा पडला आहे. उपाययोजनांसाठी तातडीने पावले टाकली नाहीत, तर प्रदूषणाचा स्तर आणखी धोकादायक पातळीला पोहोचण्याची भीती आहे.

नवी मुंबई महापालिका हद्दीतील दिघा, ऐरोली, महापे एमआयडीसी, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरूळ, सानपाडा, जुईनगर, सीवूड्स आणि बेलापूर या परिसरांचा काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. उंच इमारती, रुंद रस्ते, आयटी पार्क, मॉल्स, नवीन प्रकल्प असे सर्व काही वाढले. या विकासासोबत प्रदूषणाचा प्रश्‍नही गंभीर होत गेला आहे. हवा, पाणी, ध्वनी, कचरा यांचे प्रदूषण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरितक्षेत्र यामुळे शहराच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

नवी मुंबई शहराची निर्मिती एक नियोजित शहर म्हणून झाली असली, तरी हे शहर सद्यःस्थितीला गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत आहे. शहरीकरण, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे निर्माण झालेले प्रश्न केवळ स्थानिक नसून, त्याचे परिणाम संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रावर होत आहेत. विशेषतः फेब्रुवारी २०२६मधील आकडेवारी पाहता, नवी मुंबईची हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही स्तरांवर प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्थितीपर्यंत वाढलेली दिसून येते. या अहवालात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणीय निर्देशक, सरकारी धोरणे, न्यायालयीन हस्तक्षेप आणि भविष्यातील उपाययोजनांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com