Premium|Marathi Literature : ‘फेसाटी’ : भाकरीसाठीचा संघर्ष आणि ग्रामीण जीवनाचे अस्वस्थ करणारे वास्तव

Navnath Gore and Fesati Novel : साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीतून जत तालुक्यातील दुष्काळ, गरिबी, शिक्षणासाठीचा संघर्ष आणि दोन वेळच्या भाकरीसाठी धडपडणाऱ्या नाथाच्या वास्तवदर्शी जीवनप्रवासाचे चित्रण.
Marathi Literature

Marathi Literature

esakal

Updated on: 

विकी जाधव - viki.jadhav@esakal.com

समकालीन मराठी साहित्यात अलीकडे नुकतेच प्रकाशझोतात आलेले एक नवे नाव म्हणजे नवनाथ गोरे. ‘साहित्य अकादमी’चा २०१८चा ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार त्यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला मिळाला आणि अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांची कादंबरी अभ्यासकांच्या चर्चेचा विषय ठरली. तेव्हा एका नव्या उमद्या तरुणाची ही कादंबरी मी उत्सुकतेने वाचायला घेतली अन् एका दमात वाचूनही काढली. ही काबंदरी माझ्या थेट काळजाला भिडली. क्षणभर का होईना, मी सुन्न झालो आणि एक सुंदर वास्तवदर्शी जीवनानुभव काय असू शकतो, याची मला जाणीव झाली.

साहित्य अकादमी पुरस्कारासह २० पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला मिळाले आहेत. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एम. ए. (मराठी) पदव्युत्तर वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी ही कादंबरी घेतली आहे. मुख्यतः ‘सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरानं कुणाचं, ऐका माझ्या जन्माचं’ असे म्हणून ‘सुंबरान’ या आख्यानरूपी फॉर्ममध्ये कादंबरीची सुरुवात होते.

या कादंबरीचा नायक ‘नाथा’ हा पशुपालक, अल्पभूधारक, मेंढपाळ, शेतमजुराचा तरुण मुलगा. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ‘जत’ तालुक्यातील ‘निगडी बुद्रुक’ या गावचा सर्वसामान्य कुटुंबातील एक जिद्दी तरुण. आई-वडील, सहा बहिणी व दोन भाऊ अशा आठजणांच्या कुटुंबातील एक सुशिक्षित तरुण. अनेक हालअपेष्टा सहन करीत अकरावी ते एम. ए. बी. एड.पर्यंतचे शिक्षण तो कसेतरी घेतो. ‘जत’ तालुका मुळातच दुष्काळग्रस्त भाग असल्याने दारिद्र्य हे त्याच्या पाचवीलाच पूजलेले आहे. त्यामुळे रोजचाच संघर्ष आणि कायमचेच उपासमारीचे प्रसंग त्याच्या सोबतीला असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी द्राक्षांच्या बागेत काम करणे, गवंड्यांच्या हाताखाली बिगारी काम करणे, थोडेसे शिक्षण घेतल्यावर एटीएमवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणे... जीवन जगण्यासाठी त्याला अशा अनेक ‘भूमिका’ पार पाडाव्या लागतात. दोन वेळच्या भाकरीपेक्षा त्याला कुठलीही गोष्ट मोठी वाटत नसते. म्हणून ‘फेसाटी’ या कादंबरीत ‘भाकरी’ या तीन अक्षरी शब्दांच्या पुढे त्याने जात, धर्म, पंथ, देव, देश, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण अन् प्रसिद्धी अशा कुठल्याच गोष्टीला थारा दिला नाही.

Loading content, please wait...