

Navratri Festival Economy
esakal
ॲड. प्रतिभा देवी - pratibhasdevi@gmail.com
नवरात्रोत्सव म्हटले, की देवीची आराधना, घटस्थापना, गरबा-दांडिया आणि उत्साहाचे वातावरण डोळ्यांसमोर येते. मात्र, या उत्सवाला आर्थिक बाजूही आहे. दांडियाच्या मैदानातील प्रत्येक तिकीट, प्रत्येक पोशाख, प्रत्येक खाद्यपदार्थ आणि अगदी हातातील टिपऱ्यांमागे अनेक छोटे-मोठे व्यवसाय आणि रोजगार जोडलेले असतात. त्यामुळे नवरात्रीचा उत्सव केवळ सांस्कृतिक नाही, तर ग्राहकखर्चाला चालना देणारा आणि विविध व्यवसायांचे अर्थचक्र गतिमान करणारा हंगामही आहे.
नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नाही; तो महिलाशक्तीचा, संस्कृतीचा आणि चांगल्याचा वाईटावर होणाऱ्या विजयाचा उत्सव आहे. विशेषतः आजकाल नवरात्रीतील गरबा-दांडियाचे आकर्षण मोठे आहे. त्यामुळेच मधुरा आणि राहुल गेल्या चार दिवसांपासून दांडियाच्या कार्यक्रमाला जाण्याची चर्चा करत होते. तयारी करताना मधुरा म्हणाली, ‘‘फक्त दोन-तीन तासांचा कार्यक्रम आहे.’’ त्यावर राहुल हसत म्हणाला, ‘‘कार्यक्रम दोन तासांचा असला, तरी बजेट पाहिलंस का?’’
दोघांनी साधारणपणे असा खर्च गृहीत धरला... आता विचार करा, राहुल आणि मधुराने खर्च केलेले १० हजार रुपये कुठे गेले?