
जयेंद्र लोंढे
jayendra.londhe@esakal.com
टोकियो व पॅरिस या दोन सलग ऑलिंपिकमध्ये पदक पटकावत भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवणाऱ्या नीरज चोप्रा याने नुकत्याच पार पडलेल्या दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर दूरवर भाला फेकून इतिहास घडवला, मात्र याच लीगमध्ये जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने ९१.०६ मीटर दूर भाला फेकून नीरजच्या वरचे स्थान मिळवले. त्याआधी पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ९२.९७ मीटर भाला फेकून ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित केला. भालाफेक या खेळामध्ये गेल्या काही काळामध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. खेळाडूंमधील हा संघर्ष लॉस एंजेलिस ऑलिंपिकपर्यंत वाढत राहण्याची शक्यता आहे.