
ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
मोबाईल एकाचा, सिम कार्ड दुसऱ्याचे आणि वापरतोय तिसराच... असे प्रकार देशात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आपल्यापैकी अनेकजण दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड काढून सहजपणे वापरतात. तसेच आपल्या नावावर सिम कार्ड सुरू करून त्याचा वापर/गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या संचारसाथी पोर्टलवर आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत किंवा असतील, तर अनावश्यक सिम कार्ड बंद करण्याचीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु ही सेवा ऐच्छिक असल्याने अनेकांना त्याबाबतचे गांभीर्य नाही. हीच बाब लक्षात घेता आणि देशातील सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.