
नितीन बिरमल
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, आता प्रभागरचना अंतिम होणार आहेत. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा भौगोलिक विस्तार असणाऱ्या प्रभागांचा परिणाम होत असतो. त्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांच्या पंखाखाली जावे लागते आणि राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत जातो, असे दिसून आले आहे.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कोरोनाची महासाथ आणि सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांमुळे संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया लांबली होती. बहुतांश महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी २०१७नंतर प्रथमच निवडणुका होणार आहेत.